प्रत्येकजण श्रीकृष्णांच्या शोधात आहे. काहींना या वस्तुस्थितीची जाणीव आहे, तर काहींना नाही. श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, अखिल अस्तित्वाचे उगमस्थान आहेत, आणि भूत, वर्तमान तथा भविष्यातील प्रत्येक गोष्टीचे मूळ कारण आहेत. 9 भगवंत अनंत असल्यामुळे त्यांची नावेही अनंत आहेत. अल्ला, बुद्ध, जेहोवा, राम हे सर्व एक श्रीकृष्णच आहेत. श्रीकृष्ण निराकार नाहीत; त्यांच्या स्वरूपामध्ये निराकार आणि साकार अशा दोन्ही रूपांचा समावेश आहे. त्यांचे अलौकिक शरीर सच्चिदानंदमय आहे. समुद्रातील पाण्याच्या थेंबामध्ये अखिल समुद्रजलाचे गुण असतात त्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या चेतनेमध्ये भगवंतांच्या चेतनेचे गुण आहेत; परंतु शरीर, इंद्रियसुख, ऐहिक संपत्ती, अहंकार इत्यादींच्या रूपातील भौतिक शक्तीवर आपण आसक्त असल्यामुळे आणि या शक्तीशी तादाम्य केल्यामुळे आपली सत्य दिव्य भावना प्रदूषित झालेली आहे. धुळीने माखलेला आरसा स्वच्छ प्रतिमा प्रतिबिंबित करू शकत नाही आणि म्हणून आपली भावना या आरशाप्रमाणेच मलिन झालेली आहे. मला लिपि
अनेक जन्मांपासून आपला क्षणभंगुरतेशी घनिष्ठ संपर्क आहे. त्यामुळे आपण हाडामांसाच्या गोळ्यासच अर्थात आपल्या शरीरासच आत्मा मानत आहोत. आपण या क्षणभंगुर स्थितीसच शाश्वत सत्य मानत आहोत. प्रसार . अनेकानेक युगांमधील संतपुरुषांनी सिद्ध करून दाखविले आहे की, मनुष्यामधील ही शाश्वत आणि चिरस्थायी भगवद्भावना पुनरुज्जीवित करता येते. प्रत्येक जीव स्वरूपतः दिव्य आहे. प. श्रीकृष्ण भगवद्गीतेत (६.२८) म्हणतात की, “आत्मस्वरूपामध्ये स्थिर असलेला आणि सर्व प्रकारच्या भौतिक प्रदूषणांतून मुक्त झालेला योगी परमश्रेष्ठ चेतनेच्या संपर्कात येऊन परमोच्च परिपूर्ण सुखाची प्राप्ती करतो.” – योगमार्गाने (योग म्हणजे आत्मसाक्षात्काराची वैज्ञानिक प्रक्रिया होय) आपण आपली चेतना शुद्ध करू शकतो, चेतनेमध्ये होणारे प्रदूषण थांबवू शकतो आणि पूर्ण ज्ञानमय तथा आनंदमय अशा सर्वोच्च स्तराची प्राप्ती करू शकतो.
जर कोणी परमेश्वर म्हणून असेल तर मी त्याला पाहू इच्छितो. कोणत्याही स्पष्ट प्रमाणावाचून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे निरर्थक आहे आणि म्हणूनच कृष्णभावनाभावित ध्यान ही शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे. तिच्या आधारे मनुष्याला भगवंतांचा अनुभव होऊ शकतो. या प्रक्रियेद्वारे मनुष्य भगवंतांना पाहू शकतो, त्यांच्याशी खेळू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. ही वाक्ये कदाचित तुम्हाला वेडेपणाची वाटू शकतील; पण परमेश्वराशी संबंध ही सत्य वस्तुस्थिती आहे.
राज, ज्ञान, हठ, क्रिया, कर्म, भक्ती असे अनेक योगमार्ग आहेत. त्या त्या मार्गांच्या आचार्यांनी त्या त्या मार्गांचा प्रसार केलेला आहे. भक्तिवेदांत स्वामी हे भक्तियोगी आहेत. भक्त जेव्हा चिंतन, वाणी आणि कार्य यांद्वारे भगवंतांची सेवा करतो आणि हरिनाम जप करतो, तेव्हा तो त्वरितच भगवद्भावना विकसित करतो.
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे।।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे॥
या महामंत्राचा जप केल्याने मनुष्य निश्चितपणे कृष्णभावनाभावित होतो.
माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की, कृपया तुम्ही सर्वांनी या ‘कृष्ण, पूर्ण पुरुषोत्तम भगवान’ नामक ग्रंथाचे अध्ययन करून या ग्रंथाचा पूर्ण लाभ घ्यावा. माझी अशीही विनंती आहे की, या परिपूर्ण योगमार्गाचा अवलंब करून तुम्ही सर्वांनी भगवंतांना प्रत्यक्ष भेटण्याच्या संधीचा लाभ घ्यावा. मशाणार – आपणा सर्वांना प्रेम अर्थात श्रीकृष्णांची आवश्यकता आहे. हरी बोल.